मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (09:26 IST)

नागपूरमध्ये भीषण अपघात ; सात जणांचा मृत्यू

नागपूर उमरेड मार्गावर ट्रक आणि भरधाव तवेरा गाडीत झालेल्या भीषण धडकेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 
 
ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा ट्रक वर जाऊन आदळली आणि समोरचा भाग चक्काचूर झाला. 
 
तवेरा गाडी उमरेडकडून नागपूरच्या दिशेने जात असताना चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तवेराचा वेग जास्त असल्याने त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि तवेरा ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.