अजितदादांना त्रास, कारण मागचं सरकार तेच चालवत होते - एकनाथ शिंदे
"हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. मात्र अजितदादांना त्रास होणं स्वाभाविक आहे, कारण मागचं सरकार तर तेच चालवत होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र सरकारवर अजित पवार यांनी नुकतीच टीका केली होती. या सरकारच्या काळात केवळ स्थगिती देण्यात येत आहे, याकडेही पवारांनी लक्ष वेधलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.
ते म्हणाले, "लोकशाहीत तत्त्वं असतात, भूमिका असते, विचार असतो. आमचं सरकार एका भूमिकेतून, बाळासाहेबांच्या भूमिकेतून स्थापन झालं आहे. आमची भूमिका जनतेला पटली नसती तर आज राज्यभरात आमच्या आमदार-खासदारांचं स्वागत झालं असतं का?"
पण, सरकार चुकीचं काम करत असेल तर सल्ला देण्याचा अधिकार नक्कीच विरोधकांना असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले.