बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 20 फेब्रुवारी 2017 (15:02 IST)

राज्य निवडणूक आयोगाचे True Voter हे नवे अॅप

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत  मतदान केंद्र किती दूर आहे,तसेच कोणत्या बूथवर त्यांना मतदान करायचे आहे, याचीही माहिती घर बसल्या मिळणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाने True Voter हे नवे अॅप तयार केले असून, आगामी सर्व निवडणुकीदरम्यान हे अॅप कार्यरत असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रायोगिक तत्त्वावर याचा वापर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत केला. यावेळी मतदारांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने, आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हे अॅप कार्यरत असणार आहे.
 
निवडणूक आयोगाचे हे नवे अॅप प्ले स्टोअर्सवर उपलब्ध असून, या अॅपच्या माध्यमातून मतदार आपले मतदार यादीतील नाव सहज शोधू शकतील. विशेष म्हणजे, निवडणूक क्षेत्रात कोणता उमेदवार उभा आहे, त्याची सर्व माहिती या अॅपवर उपलब्ध असेल. यामध्ये उमेदवाराची संपत्ती, त्याचे शिक्षण, त्याच्या विरोधात दाखल असलेले गुन्हे, आदीची सर्व माहिती या अॅपवरुन उपलब्ध असेल. हे अॅप केवळ मतदारांनाच नव्हे, तर उमेदवारालाही तितकेच उपयोगाचे असणार आहे. कारण, या अॅपवरुन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, उमेदवाराने किती खर्च केला, याचा हिशेब उमेदवाराला आयोगाला द्यावा लागतो. हा सर्व खर्च उमेदवाराला या अॅपच्या माध्यामातून निवडणूक आयोगाला देता येणार आहे.