शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: तांदूळवाडी , शनिवार, 4 मार्च 2023 (12:26 IST)

शर्यतीदरम्यान दोन बैलांचा मृत्यू

Bullock Cart
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त काका धुमाळ यांनी बैलगाडी शर्यतीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते. 
 
दुपारच्या सुमारास बैलगाड्यांची शर्यत सुरु असतानाच बैलगाडीने चाकोरी सोडली आणि तेट कृष्णा दनी पात्रात बैलगाड्या गेल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामध्ये बैलगाडा चालकाने वेळीच उडी मारल्याने तो मात्र बचावला. 
 
पण दुर्दैवी दोन बैलांचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला, ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. बैलांची किंमत सुमारे दहा लाख रुपये आहे. यामुळे बैलगाडा मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.