सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (07:56 IST)

नगर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू !

accident
नगर औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात दोन कराची समोरा समोर टक्कर झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, काल गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा कारला समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे झालेल्या रस्ता अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
 
मृतांमध्ये एक पुरुष आणि एक स्त्रीचा समावेश आहे तर या अपघातात शिखा मुरलीधर गडपायले (वय-३६) ही महिला गंभीर जखमी झाली असून तीच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखाण्यात औषधोपचार सुरु आहे.
 
पुणे येथील पिंपरी सौदागर येथून आपल्या क्रेटा कार (क्रमांक एम.एच.१४ जे.एक्स ४०२४) हे वाहन औरंगाबादच्या दिशेने जात असतांना समोरुन येणाऱ्या डस्टर कारने हुलकावणी दिल्यामुळे कांगोणी फाटा शिवारात झालेल्या अपघातात
 
क्रेटा कारमधील परेश मुरलीधर गडपायले (३२) रा.पुणे पिंपरी सौदागर, तसेच सोनिका भिमराव आवसरमोल (३२) रा. औरंगाबाद हे या अपघातात जागीच ठार झाले आहे.
 
तर तिसरी महिला शिखा मुरलीधर गडपायले (३६) या झालेल्या अपघातात क्रेटा कारमध्ये अडकल्या होत्या. त्यांना जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढून त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात औषधोपचार सुरु आहेत.