रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (11:54 IST)

नागपूर जिल्ह्यात भिंत कोसळून दोघांचा दबून मृत्यू

death
Nagpur News मागील दोन दिवसांपासून नागपुरात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील काही भागात पावासाने चांगलेच नुकसान केले आहे. दरम्यान गोंडवाना चौकातील जेपी हाईट्स इमारतीची भिंत कोसळ्याने 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
नागपूर ग्रामीण मधील नारखेड काटोल तालुक्यातील काही गावांमध्ये चांगला पाऊस झाला. येथील काही ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांना नुकसान झाल्याचे कळून येत आहे.
 
अवकाळी पावसामुळे वातावरणात चांगलाच बदल झाला आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. शहरात देखील सोसाट्याचा वाऱ्यामुळे अनेक भागात झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहे तसेच अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.