Dharma Sangrah

पर्यटनाचा आनंद बेतला जीवावर! देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना

सोमवार, 13 जुलै 2026 (13:03 IST)
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. देवकुंड धबधब्यावर दोन पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे.
ALSO READ: मुंबई गुन्हे शाखेने बनावट पोलीस अधिकारी आणि डॉक्टरला अटक केली; २८ वर्षांपासून लोकांची फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील चाकणहून २१ जणांचा एक गट पावसाळी पर्यटनासाठी रायगडच्या माणगाव येथील देवकुंड धबधब्याला भेट देण्यासाठी आलेला होता. त्यामधील दोन तरुण धबधब्यात बुडून मरण पावले. हे दोन्ही तरुण पुणे जिल्ह्यातील चाकण भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. १२ जुलै रोजी, चाकण येथील २१ जणांच्या गटातील गोपाल रामराव राठोड (२४) आणि विष्णू धोक (२३) हे देवकुंड धबधब्यात पोहण्यासाठी आणि भेट देण्यासाठी आले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्यामुळे हे दोन्ही तरुण खोल पाण्यात वाहून गेले. रविवारी दुपारी हा अपघात घडला.  

पोलिसांची उपस्थिती असूनही पर्यटक धबधब्यापर्यंत कसे पोहोचले?
मिळालेल्या माहितीनुसार, माणगावच्या देवकुंड धबधब्यावर आणि इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी असूनही, पर्यटकांची गर्दी धबधब्याकडे होत आहे. पोलिसांचे संरक्षण असूनही पर्यटक धबधब्यापर्यंत कसे पोहोचले? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 
ALSO READ: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर यशवंतपूर-बिकानेर एक्सप्रेसवर दरोडा, लाखो रुपयांची लूट
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिका सुरू होणार, विजयाची अपेक्षा

LIVE: जेजुरीजवळ अनियंत्रित ट्रकने महिला वारकऱ्यांना चिरडले

अमित शाहांचा फोन आला होता आणि दिल्लीला बोलावून 'भाजप जॉईन करो' असं सांगितलं, खडसेंच्या दाव्याने खळबळ

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर; शरद पवारांचा विक्रम मोडला

'लाडकी बहीण योजना' वादाच्या भोवऱ्यात! तब्बल ९२ लाख अर्ज अपात्र; नावे वगळण्याची ७ प्रमुख कारणे!

पुढील लेख
Show comments