Festival Posters

पुण्यात दुचाकी आता सीएनजीवर धावणार

एकेकाळी पुण्याची ओळख सायकलींचे शहर म्हणून होती. मात्र, आजमितीस या शहराची ओळख ‘दुचाकींचे शहर’ म्हणून होऊ लागली आहे. पेट्रोलवर धावणार्‍या दुचाकींसोबत आता सीएनजीवरही दुचाकी धावणार आहे. राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे.
देशात वाढत्या प्रदूषणाच्या शहरांमध्ये पुण्याचा तिसरा क्रमांक लागतो. या शहरात ३७ लाख फक्त दुचाकीची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात दुचाकींची गर्दी होऊ लागली आहे. रस्ते अपुरे पडल्याने प्रसंगी शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीसह वायुप्रदूषणाला पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र नॅचुरल गॅस आणि आयटुक या कंपनीने दुचाकीवर मोपेड किट बसवले असून यामध्ये एक किलोचे दोन सिंलेडर राहतील.
 
यामध्ये एक किलोमध्ये ६५ किलोमीटर इतके ऍव्हरेज मिळणार आहे. शिवाय याचा देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी लागतो. यामध्ये गॅस संपल्यास पेट्रोलचाही वापर दुचाकीस्वाराला करता येणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत गॅसचा दरही अर्धा असल्याने नागरिकांचा पेट्रोलवर होणारा खर्चही निम्म्यावर येईल. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राज्यात प्रथम पुण्यात सुरू करण्यात आला. प्रतिसाद वाढल्यानतंर शहरात एमएनजीएलच्या माध्यामतून सेंटर वाढविले जाणार आहेत.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने कायदेशीर नोटीस पाठवली

LIVE: एमपीसीबीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस पाठवली

महाराष्ट्र सरकारकडून ४ वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा

एमपीसीबीने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस पाठवली

पावसाळ्यात गाडी स्टार्ट होत नाही? मेकॅनिककडे जाण्यापूर्वी हे 5 उपाय करून पाहा

पुढील लेख
Show comments