शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

उद्धव ठाकरे- नारायण राणे एकत्र येणार

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमीपूजन कार्यक्रमानिम्मित दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 23 जूनला हा भूमीपूजनचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थीत असणार आहे.

राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील स्थानिक आमदार म्हणून नितेश राणे आणि विधान परिषद आमदार नारायण राणे यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्‍यता आहे. नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असणार आहे.