गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2017 (09:21 IST)

सरकार पाकीटमार - उद्धव ठाकरे

नोटाबंदी करुन तुम्ही गरिबांच्या कष्टाचा पैसा या  खिशात हात घालून काढला आणि स्वतः चा फायद्यासाठी वापरला आहे. तुम्ही सरकार नाही  पाकिटमार सरकार  आहात असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. उद्धव ठाकरे यांची भांडुप येथील जाहीर सभेत भाजपा विरोधात जोरदार टीका केली आहे. यामध्ये   पक्षाचे लोक तिकीट देताना लाच मागताना सापडत आहेत त्या पक्षाने आम्हाला पारदर्शकता शिकवू नये असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  विरोधी पक्ष नेता, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग), यांची आधी नियुक्ती करा आणि मग आम्हाला पारदर्शकता म्हणजे काय आम्हाला सांगा अशी घनाघाती टीका त्यांनी केली आहे.