deepawali
✕

सामनाची मुंबई कुलगुरूंवर झहरी टीका, निकालांचे श्राद्ध - उद्धव ठाकरे

Updated: मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:48 IST)

: मुंबई विद्यापीठाचे वैभवशाली टॉवर झडताना व पडताना दिसत आहे. ज्या विद्यापीठाने अनेक पिढय़ा घडवल्या ते विद्यापीठ परीक्षा व निकालांचे श्राद्ध घालताना दिसत आहे. संघविचाराचे आहेत म्हणून कुलगुरूंना माफी नाही. त्यांना जावेच लागेल. कुलगुरूंची वकिली करणाऱ्यांच्या जिव्हा झडून जातील व लाखो विद्यार्थ्यांचे तळतळाट त्यांना लागतील. मुंबई विद्यापीठातील अनागोंदीमुळे चार लाख विद्यार्थ्यांच्या जीवनात जे ‘खड्डे’ पडले आहेत त्यावरही कुणी तरी आता ‘‘मुंबई, तुझा विद्यापीठावर भरवसा नाही काय!’’ असे गाणे वाजवायला हरकत नाही!

अनागोंदीची जबाबदारी
शिक्षण मंत्री तसेच विद्यापीठाच्या कुलगुरूंवर तर जातेच, पण इतका बेफिकीर, अकार्यक्षम कुलगुरू नेमणाऱ्या सरकारवरदेखील जाते. नव्या राजवटीत कुलगुरू निवडीचा घोटाळा झाला आहे व तो गंभीर आहे. राज्यपालांच्या नेमणुका या संघविचारक आणि प्रचारकांच्याच झाल्या आहेत. देशात प्रथमच संघविचारक व प्रचारक हे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान बनले आहेत, पण निदान पिढी घडवणाऱ्या शैक्षणिक संस्था तरी त्यातून सुटाव्यात व ‘मेरिट’वर या नियुक्त्या व्हाव्यात. संघविचार हा गुन्हा नाही व त्या विचाराने कुणाचे नुकसान होणार नाही. आम्ही तर सरसंघचालकांचेच नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले होते, पण सध्या मुंबई विद्यापीठाची जी घसरण सुरू आहे ती पाहता सरसंघचालक कुलगुरूंना व त्यांना नेमणाऱ्यांना काठीने फोडून काढतील असे चित्र आहे. 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments