शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (09:30 IST)

महाराष्ट्रात आता रतन टाटांच्या नावावर उद्योगरत्न पुरस्कार, राज्य शासनाचा निर्णय

uday samant
ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले त्यांच्या निधनामुळे देशात शोककळा पसरली आहे. 
आता रतन टाटा यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे.

राज्य सरकारने टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याऱ्यांना राज्य शासन रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार देणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 
 
गेल्याच वर्षी 19 ऑगस्ट 2023 रोजी  उद्योगपती रतन टाटा यांना राज्य सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

रतन टाटांना गेल्या वर्षी मिळालेला पुरस्काराच्या धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न पुरस्कार आता त्यांच्या नावावर देण्यात येत आहे.  
Edited By - Priya Dixit