सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (13:52 IST)

यंदाची भाऊबीज ठरली शेवटची, बहिणीकडे गेलेल्‍या भावाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

death
जळगाव- भाऊबीज हा भावा-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण साजरा करण्यासाठी बहिणीकडे आलेल्या भावावर काळाने घाला घातला आहे. पाचोरा येथील 17 वर्षीय युवकाचा वालझिरी, चाळीसगाव येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
पाचोरा शहरातील श्रीराम नगरातील रहिवाशी राहुल सुरेश चौधरी हा 27 ऑक्टोंबरला भाऊबीजेसाठी बहिणीकडे गेला आणि मोठ्या उत्साहात भाऊबीज सण साजरा केला गेला. त्‍याच दिवशी दुपारी राहुल हा वालझिरी येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला असताना नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला. तेव्हा राहुलचा पाय घसरून तो खोल पाण्यात पडला. 
 
त्याला उपस्थितांच्या मदतीने पाण्यातुन बाहेर काढून लगेच रुग्णालयात दाखल केले गेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.