शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2023 (08:24 IST)

नाशिकरोड कारागृह पुन्हा चर्चेत, कारागृहातील बंदींवर अनैसर्गिक अत्याचार

jail
नाशिक मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातील कैद्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये देखील अशीच घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
 
नाशिकरोड येथील कारागृहातील हा प्रकार असून पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता संशयित बंदीवानाने अनैसर्गिक अत्याचार केला. विजय रामचंद्र सोनवणे असे या संशयिताचे नाव आहे.
 
काही दिवसांपूर्वी मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये आरोपींनी स्नानगृहात एका 23 वर्षीय कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी बराकमध्ये या कैद्याला शिवीगाळ केली, तसेच त्यातील आरोपीने पीडित कैद्याला मारहाणही केल्याचा प्रकार घडला होता.
 
आता ऑर्थर रोड तुरुंगापाठोपाठ नाशिकच्या तुरुंगातही बंदीवानावर अनैसर्गिक अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सर्कल नंबर 5 मधील बॅरेक नंबर 1 मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता संशयित बंदीवानाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची माहिती आहे.
 
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित न्याय बंदीच्या फिर्यादीनुसार सदरील घटना मागील आठवड्यात बुधवारी रात्री घडलेली आहे. कारागृहातील सर्कल नंबर 5 मधील डायरेक्ट क्रमांक एकमध्ये घडली आहे. फिर्यादी न्यायबंदी शौचालयात लघुशंकेसाठी गेला असता संशयित सोनवणे यांनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पीडिताने तुरुंग रक्षकाला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक काकडे हे करीत आहेत.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor