मुंबई कोकणात अवकाळी पाऊस येणार, विदर्भ मराठवाड्यात गारपिटीची शक्यता
राज्यातील काही भागात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे मुंबई, कोकणांत हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या पाच दिवसात उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, पालघर येथे हलक्या सरी बारसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
सध्या आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात कर्नाटक, केरळ राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या मुळे महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली असून मध्ये महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या काही ठिकाणी येत्या पाच दिवसांत गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानं पुणे, लातूर, नांदेड, या 4 जिल्ह्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या शिवाय येत्या पाच दिवसांत विदर्भ,खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यात वादळासह गारपिटीची शक्यता आहे.तसेच या भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Edited by - Priya Dixit