शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (07:57 IST)

खान्देशात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Rain In Maharashtra
जळगाव शहरासह जिल्ह्यातील चाळीसगाव,भडगाव,पाचोरा तालुक्यात काल सायंकाळी आवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. याअगोदरच हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार जळगाव शहर व परिसरात काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तसेच चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाल्याचे वृत्त आहे . अवकाळी पावसामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाने 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता.उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

Edited By - Ratnadeep Ranshoor