गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (16:34 IST)

Vasai : मुलाच्या वाढदिवसाला 221 किलोचा केक कापला

social media
आई वडील आपल्या मुलाच्या आनंदासाठी काहीही करतात. मुलाला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या  सर्व इच्छा पूर्ण करतात. हौशी पालक असल्यास काय म्हणावं. आपल्या मुलाच्या वाढदिवसाला त्याची हौस पूर्ण करण्यासाठी  वसईतील एका व्यक्तीने 3 लाख रुपये  खर्च करून वाढदिवसाला  तब्बल 221 किलोचा गाडीची प्रतिकृतीच्या केक तयार करून मुलाकडून कापवून घेतला. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्त वसई पूर्वतील कामन येथे नवीन हरिश्चंद्र भोईर हे खिंडपाडातिल एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. त्यांच्या घरी लग्नाच्या 6 वर्षानंतर रेयांश नावाचा मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर तो आजारी होता. 4 मार्च रोजी रेयांशचा दुसरा वाढदिवस होता. भोईर यांनी रेयांशच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला हेलिकॉप्टरमध्ये नेऊन वाढदिवस साजरा  केला होता. तर यंदा रेयांश च्या दुसऱ्या वाढदिवसाला त्याला आवडणाऱ्या वेरणा कारची प्रतिकृती असणाऱ्या तब्बल 3 लाखाचा 221 किलोचा केक कापून थाटामाटात साजरा केला. या केकची चर्चा वसईत होत आहे.      

Edited By - Priya Dixit