मुंबईत टॅक्सी थांबवण्यासाठी टॅक्सीच्या छतावर बसलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
मुंबईत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एक वेगवान टॅक्सी धावत आहे. आणि टॅक्सीच्या छतावर एक व्यक्ती बसलेली असून ती टॅक्सी चालकाला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टॅक्सीच्या छतावर बसलेल्या व्यक्तीच्या वाहनाला या टॅक्सीचालकाने धडक दिली आता तो पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. टॅक्सी थांबवण्यासाठी तो टॅक्सीच्या छतावर बसला आहे. व्हिडिओमध्ये टॅक्सीची पुढील काचही तुटलेली दिसत आहे.
हा व्हिडीओ मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील वाकोला उड्डाणपुलावर टॅक्सीमध्ये बसलेल्या व्यक्तीचा लोकांनी व्हिडिओ बनवला. टॅक्सीच्या छतावर बसलेली व्यक्ती ड्रायव्हरला थांबायला सांगत आहे. मात्र चालक भरधाव वेगाने टॅक्सी चालवताना दिसत आहे.
वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडिओचा तपास सुरु आहे. पोलिसांना हा व्हिडीओ मिळाला आहे. पोलिसांकडे सध्या कोणतीही तक्रार आलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती आणि चालकाचा शोध घेतला जात आहे. टॅक्सीचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्राचे आहे. हा तरुण टॅक्सी चालकाला गाडी थांबवण्याची वारंवार विनंती करत आहे मात्र चालक त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे.
Edited By - Priya Dixit