शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:21 IST)

उर्वरित 10 आमदारांचे निलंबन मागे

अर्थसंकल्पादरम्यान विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी बराच गदारोळ घातला होता. त्यावेळी 19 आमदारांचं निलंबनही करण्यात आलं होतं. त्यानंतर एक एप्रिलला 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं. विधानसभेत निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव  मंजूर करण्यात आला. आमदारांची नावे खालीलप्रमाणे १. अमर काळे – काँग्रेस, आर्वी, वर्धा, २. भास्कर जाधव – राष्ट्रवादी, गुहागर , रत्नागिरी, ३. विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, ४ . मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी, ५. हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा, ६. कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण, ७. जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा, ८. राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर,  ९. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे, १०. संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर.