बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (09:18 IST)

Warning in Maharashtra महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा

चीनमध्ये  न्यूमोनिआचा उद्रेक झाला आहे. या न्यूमोनिआमुळे रोज हजारो मुले रुग्णालयात दाखल होत आहे. चीनमधील या प्रकारानंतर भारताही पावले उचलली गेली आहे. केंद्र सरकारकडून सगळ्या राज्याच्या आरोग्य विभागला सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या हिवताप विभागाचे सहसंचालक प्रताप सरणीकर यांच्याकडून राज्यातील सगळ्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला सूचना जारी केल्या आहेत. सध्या तरी भारतात याचा धोका नसला तरी सगळी आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे.
 
काय आहे “अ‍ॅडव्हाझरी”चीनमध्ये कोरोनाचा उद्रेकानंतर आता न्यूमोनिआचा प्रसार वेगाने होत आहे. संसर्ग इन्फ्लुएझा, मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोव्हिडमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात केंद्रसरकारकडून आलेल्या सूचनानंतर महाराष्ट्रात “अ‍ॅडव्हाझरी” जारी करण्यात आली आहे. प्रत्येक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात सारीच सर्वेक्षण करा, श्वसनसंस्थेचे येणारे अहवाल गांभीर्याने घ्या, मनुष्यबळ प्रशिक्षण देवून तयार कराव,ऑक्सीजन प्लांट, खाटाची व्यवस्था करण्यात यावी, उद्रेक परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज करावी, असे आदेश आरोग्य विभागाने सर्व महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य विभागातील केंद्रांना दिले आहे.
 
काय आहेत न्यूमोनिआची लक्षणे
श्वास घेण्यासाठी त्रास होतो, दम लागतो आणि ठसका लागतो.ताप येणे, थंडी वाजते व खूप घामही येतो.ह्रदयाच्या ठोक्यांचे प्रमाण वाढते.कफ, छातीत दुखणे, उलट्या होणे किंवा डायरिया ही लक्षणे दिसू लागतात.काय दिल्या सूचनाज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहेत, त्यांनी आणि लहान मुलांनी फ्लूचे लसीकरण दरवर्षी करुन घ्यावे, अशी सूचना फुफ्फुस तथा श्वसनविकार तज्ज्ञ डॉक्टर हिमांशू पोफळे यांनी केली आहे.