शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (13:06 IST)

तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर

टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना शुक्रवारी तिसऱ्यांदा समन्स बजावले. मात्र ते शुक्रवारीही चौकशीसाठी गैरहजर होते.
 
ईडीने नुकतीच सरनाईक यांचा जवळचा मित्र अमित चांडोळे याला अटक केली. तो तीन दिवसांच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून एमएमआरडीएच्या सुरक्षाक्षकांच्या घोटाळ्यातील नफ्यात सरनाईक यांचा ५० टक्के वाटा असल्याचे समोर आले. अमितने हे पैसे सरनाईक यांना देत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे एमएमआरडीएची फसवणूक करून मिळवलेला नफा भ्रष्टाचार असल्याने या गुन्ह्यात आणि  कटात सरनाईक यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे.
 
याच्याच चौकशीसाठी बुधवारी विहंग आणि प्रताप सरनाईक यांना बोलाविण्यात आले होते. यापूर्वी मंगळवारी विहंगकडे पाच तास चौकशी करण्यात आली होती. तर सरनाईक यांनी परदेशातून आले असल्याने विलगीकरणात असल्याने तसेच विहंग यांची पत्नी रुग्णालयात दाखल असल्याने दाेघांचीही पुढच्या आठवड्यात एकत्रित चौकशी करण्याची विनंती केली होती. दोघेही चौकशीला गैरहजर होते. मात्र ईडीने गुरुवारी विहंग यांना पुन्हा समन्स बजावले. मात्र विहंग चौकशीसाठी हजर झाले नाहीत. शुक्रवारी तिसऱ्यांदा त्यांना समन्स बजाविण्यात आले होते. मात्र त्यांची गैरहजेरी कायम राहिली.