लवकरच राजीनामे देणार - संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे
आम्ही शिवसेनेचे मंत्री आणि आमदार राजीनामे खिशात घेऊन फिरतो म्हणजे फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहत आहोत. जेव्हा साहेब आदेश देतील, त्यावेळी सर्व मंत्री राजीनामे देतील, असं स्पष्टीकरण संसदीय कार्य राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिलं आहे.त्यामुळे निवडणुका पूर्ण झाल्या की लगेच शिवसेना आपला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा पाठींबा काढणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश देताच शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामे देतील अस मत विजय शिवतारेंनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. शिवसेनेला भाजपा किमत देत नाही हे अनेकदा सिध्द झाले आहे.