1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Vineyards destroyed due to rain in Solapur taluka

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सोलापूरमध्ये द्राक्षांच्या बागांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट

सोलापूरच्या पाडसाली गावातील द्राक्षांच्या बागांचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मंत्री आशिष शेलार यांनी नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना शासकीय मदतीचे आश्वासन दिले.
 
उत्तर सोलापूर तालुक्यात पाडसाली गावात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे द्राक्षांच्या हिरव्यागार बागा जवळजवळ नष्ट झाल्या आहे. शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली असून, त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
 
माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी नुकसानीची पाहणी केली. आपली उद्ध्वस्त झालेली शेतं दाखवताना शेतकरी भावूक झाले. पाडसाली गावातील शेतकरी अंकुश शिरसाट यांनी आपली साडेतीन एकर द्राक्षांची बाग गमावली असून, काही क्षणांतच महिन्यांची मेहनत वाया गेल्याने ते खूप दुःखी झाले आहे.
मंत्री शेलार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सरकार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी घटनास्थळी सांगितले की, प्रशासनाला पंचनामा तयार करण्याचे आदेश देण्या आले आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई सुनिश्चित केली जाईल.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली