सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (23:31 IST)

लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

बदलापुरात कोरोना लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात दुपारी हा प्रकार घडला. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
 
कोरोना लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्ते वशिलेबाजी करत असल्याच्या तक्रारी बदलापुरात अनेकदा समोर आल्या होत्या. त्यातच आज बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते थेट एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळालं. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. अक्षरशः खाली पाडून लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडण्यात आलं. याचवेळी एका गटाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात थेट बेंच टाकला. या सगळ्यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ मोठा तणाव निर्माण झाला. हाणामारीचा हा सगळा प्रकार लसीकरण केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.