राज्यातील 4 विधानपरिषदेसाठी मतदान आज
मुंबईसह राज्यातील 4 विधानपरिषदेच्या जागांसाठी आज निवडणूक होत आहे. सकाळी 7 वाजे पासून मतदान सुरु झाले असून मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार हे उमेदवार लढत आहे.
मुंबई मतदार संघात 30 वर्षांपासून शिवसेनेचा आधिपत्य आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने या संघावर विजय मिळवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले आहे. तर उद्धव ठाकरे शिवसेनेने मुंबईत पुन्हा आपले हक्काचे मतदार मतदानासाठी आणायची खबरदारी घेतली आहे.
मुंबई शिक्षक मतदार संघात 5 उमेदवार निवडणुकीत उतरले आहे. या मध्ये लोकभारतीचे सुभाष मोरे, ठाकरे गटातून ज.मो.अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटातून शिवाजी शेंडगे हे आहे. हा मतदार संघ जास्त नोंदणी केलेला उमेदवार विजयी होण्याची संधी देतो.
कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे, काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत आहे. तर नाशिकच्या शिक्षक मतदार संघातून शिंदे गटातून विद्यमान आमदार किशोर दराडे ,शिवसेना गटातून संदीप गुळवे हे लढत आहे.
Edited by - Priya Dixit