1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Warning of rain with gusty winds in Madhya Maharashtra and Konkan

भारतीय हवामान विभागाने 'या' 5 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागल्याचे संकेत दिले असून राज्यातील ५ प्रमुख जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. एका बाजूला विदर्भात उष्णतेची लाट असताना, दुसऱ्या बाजूला या ५ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ते ५ जिल्हे पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असून या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास ते २ दिवसांत विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह (मेघगर्जना) मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो.
 
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
राज्याच्या इतर भागांमध्ये परिस्थिती बरीच वेगळी आहे. दक्षिण कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या भागांमध्ये ताशी ४०-५० किमी वेगापर्यंत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, पुणे आणि सातारा येथील घाट भागांसाठी पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
 
या व्यतिरिक्त अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, ठाणे, रायगड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.
या पावसामुळे नागरिकांना कडक उन्हापासून नक्कीच काहीसा दिलासा मिळेल, परंतु वादळी वारा आणि विजांचा कडकडाट होणार असल्याने झाडांखाली थांबणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या काळजीच्या सूचनांचे पालन करावे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट