बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 ऑगस्ट 2017 (09:40 IST)

अंबोली घाटातील दोघांचे मृतदेह बाहेर काढले

दरीत कोसळलेल्या दोन तरुणांपैकी दुसर्‍या तरुणाचाही मृतदेह  आंबोली कावळेसाद येथे बाहेर काढण्‍यात आला आहे. हे सर्व काम  शिवदुर्ग मित्र क्‍लब, लोणावळा यांनी केले आहे. अथक प्रयत्न करत जवळपास ६०० फुट खोल दरीतून  २ वाजता इम्रान गारदी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्‍यात आला. 

 प्रताप याचा मृतदेह  काल दुपारी २.३० वाजता  बाहेर काढण्यात सांगली आपत्‍काकालीन पथकाला यश आले होते. सांगली पथकातील बाबल अल्‍मेडा, किरण नार्वेकर व सचिन नार्वेकर हे वरून दरीत उतरले होते. त्यानंतर त्यांनी दोरखंडाच्या सहाय्‍याने प्रतापचा मृतदेह बाहेर काढला होता. हे दोघे तरुण दारू पिवून झिंगलेल्या स्थितीत तेथे गेले होते आणि खाली पडले आहेत.