मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (09:10 IST)

नाशिकात पत्नीचा चार्जरच्या वायरीने गळा आवळून खून

murder
शहरातील वडाळा परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित पतीस अटक केली आहे संबंधित संशयित आणि चरित्राच्या संशयावरून मोबाईल चार्जर च्या वायरीने गळा आवळून खून केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील वडाळा परिसरात राहणारा रिजवान पठाण हा त्याची पत्नी व मुलांसह राहत होता तू वारंवार त्याची पत्नी निनाद रिजवान पठाण तिच्या चरित्रावर संशय घेऊन तिच्याशी वाद घालत होता त्यांच्यात लहान मोठे वाद होऊनही निनाज कुटुंबाचा सांभाळ करत होते मात्र काल मध्यरात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान रिजवान यांनी घरातील मोबाईलच्या चार्जर च्या साह्याने त्याची पत्नी केला या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी रिजवानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.