संयुक्त कारवाईत वन्यजीव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश; अनेक प्राणी जप्त, ६ आरोपींना अटक
सीबीआय आणि डीआरआय मुंबईने महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये संयुक्त कारवाई करून वन्यजीव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला तसेच पथकाने दुर्मिळ प्रजातींची सुटका केली. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सीबीआय आणि डीआरआय मुंबईने वन्यजीव तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करून संरक्षित प्राणी आणि पक्ष्यांची सुटका केली. सीबीआय-डीआरआयने या प्रकरणात सामील असलेल्या सहा आरोपींना अटकही केली.
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत, सीबीआयने स्लो लोरिस, बिंटुरोंग, स्टार कासव, इजिप्शियन गिधाडे आणि शिक्रा पक्षी जप्त करून त्यांची सुटका केली.
सीबीआय-डीआरआयची ही संयुक्त कारवाई महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी करण्यात आली.
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: महाराष्ट्रात राजकीय वादळ; शरद पवार यांची एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक, राऊतांनी सोडले टीकास्त्र