गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (21:11 IST)

याला आता ‘मदर जिहाद’म्हणणार का?, सचिन सावंत यांचा सवाल

sachin sawant
गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादचा हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावरुन आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबईतल्या लालबागमधील एका मुलीने आपल्या आईची हत्या केल्याच्या घटनेचा दाखला देत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधलाय. भाजप आणि संघाचे लोक याला आता ‘मदर जिहाद’ म्हणणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
 
ज्या प्रमाणे हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या हत्या प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणता. मग आता मुलीने आपल्या आईची हत्या केलेल्या या प्रकरणाला तुम्ही ‘मदर जिहाद’ म्हणणार का? अशा थेट सवालच सचिन सावंत यांनी भाजपाला केलाय. त्यामुळे मुंबईला हादरवून सोडणाऱ्या या आईच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारणं तापले आहे. लव्ह जिहाद हा नवीन जुना वाटत असला तरी या मुद्द्यावरून वेगवेगळं राजकारण रंगताना दिसत आहे. आतापर्यंत लव्ह जिहादचा मुद्दा उचलून धरलेल्या भाजपाला सचिन सावंत यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor