शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (19:12 IST)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार का भाजपचे पुढील अध्यक्ष?

devendra fadnavis
यंदा झारखंड, महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सर्व प्रादेशिक पक्ष आपली रणनीती आखत आहे. केंद्रात भाजप संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करू शकते. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना सप्टेंबर पर्यंत लोकसभा निवडणुकीनंतर मुदतवाढ दिली होती. ते आता केंद्रात मंत्री झाले आहे. आता त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा आहे. त्यांच्या जागी आरएसएस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही जबाबदारी देऊ शकता अशी बातमी येत आहे. 
 
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पदावरून राजीनामा देत केंद्रीय नेतृत्वासमोर संघटनेत काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.  

मात्र, त्यावेळी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. दरम्यान, आता पक्ष देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप या बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 
सूत्रांच्या हवाल्याने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळू शकते असे बोलले जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit