1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 20 एप्रिल 2024 (14:28 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशोक चव्हाण यांना जेलमध्ये पाठवण्याचे वचन पूर्ण करतील का? काँग्रेस नेता जयराम रमेश यांचा प्रश्न

jayram ramesh
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र नांदेड मध्ये होणारी जनसभेच्या पूर्वी काँग्रेसने शनिवारी भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोपाचा उल्लेख केला. पार्टीने प्रश्न विचारला की, पंतप्रधांनी सांगायला हवे की ते चव्हाण यांना जेल मध्ये पाठवण्याचा आपले10 वर्षपूर्वीचे वाचन पूर्ण करतील का? 
 
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आपल्या एका जुन्या पोस्टमध्ये सांगितले ते की, आज पंतप्रधान महाराष्ट्रातील नांदेड आणि परभणी मध्ये सभा संबोधित करायला जात आहेत. त्यांना आमचे प्रश्न आहेत की, प्रधानमंत्री भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांना जेल मध्ये टाकण्याचे आपले वाचन पूर्ण करतील का? मराठवाड्यामध्ये कोरड आणि पाणी कमतरता यासाठी भाजपजवळ काही योजना आहे? नांदेड मंडळ मध्ये भारतीय रेल्वेची एवढी खराब स्थिती का आहे? 
 
ते म्हणालेत की, पंतप्रधान यांनी 30 मार्च 2014 ला नांदेमध्ये दिलेल्या आपल्या भाषणात बोललेले आपले शब्द आठवायला हवे. तेव्हा त्यांनी अशोक चव्हाण यांच्याबद्दल कडक शब्द बोलले होते. जे आता भाजपच्या 'वाशिंग मशीन योजना' चे नवीन लाभार्थी आहे. 
 
पंतप्रधान हे चव्हाण यांना आदर्श उमेदवार म्हणाले होते आणि बोलले होते की, ते जर पंतप्रधान बनले तर अशोक चव्हाण यांना 6 महिन्यांच्या आत जेल मध्ये पाठवतील. अशोक चव्हाण यांचे नाव महाराष्ट्रातील चर्चेत असलेली आदर्श सोसायटी घोटाळा यामध्ये आले होते. 
 
जयराम रमेश यांनी प्रश्न केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांना जेल मध्ये टाकण्याचे आपले वचन पूर्ण करतील का? तसेच काँग्रेस नेत्याने महाराष्ट्रातील काही क्षेत्र कोरडे असल्याने प्रश्न विचारले. ते म्हणालेत की, मागच्या चार महिन्यापासून कोरडया स्थितीचा सामना केल्यानंतर मराठवाडा आता अवकाळी पाऊस आणि ओला दुष्काळ यांमध्ये सापडला आहे. 
 
जयराम रमेश म्हणालेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेला दुर्लक्षित का करत आहे? त्यांच्या सरकार जवळ त्या नदीची रक्षा करण्यासाठी काही योजना नाही का? जी या कोरड्या क्षेत्रासाठी खूप महत्वपूर्ण आहे. 
 
तसेच त्यांनी हा प्रश्न देखील केला की, नांदेड मधील रेल्वे मंडळाकडे लक्ष का दिले जात नाही?  मराठवाडा क्षेत्राच्या विकासासाठी पंतप्रधानांजवळ काही उपाय नाही का?  

Edited By- Dhanashri Naik