1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (18:35 IST)

'उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का,' एकनाथ शिंदे यांचा सवाल

eknath shinde
बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडात मारली होती. त्या प्रमाणे उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
 
राहुल गांधी यांनी सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
 
त्यावेळी शिंदे यांनी राहुल गांधी याचा धिक्कार करत असल्याचं म्हटलं आहे.
 
राज्यात सावरकर गौरव यात्रा सुरू करणार असल्याची घोषणासुद्धा यावेळी शिंदे यांनी केली आहे.
 
रविवारी (26 मार्च) ला नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला विरोध केलाय.
 
"विनायक दामोदर सावरकर हे आमच्यासाठी दैवत आहेत, त्यांचा अपमान करू नका," असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला होता.
 
शनिवारी राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांना इशारावजा सल्ला दिला. “गद्दार, ढेकणांना चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही," असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
savarkar banner
जाहीर सभेत वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करण्याचा अत्यंत बालिश आणि जनतेला मूर्ख समजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. पण जनतेने तुमचा दुटप्पीपणा ओळखला आहे. तुम्ही बोलत रहा, आम्ही मारल्यासारखे करतो, असाच हा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी चालविला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.
 
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरचा डीपी बदलून त्या ठिकाणी ‘आम्ही सारे सावरकर,’ असं फोटो ठेवला आहे.