बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (08:40 IST)

एक-दोन अपवाद सोडले तर 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही - शरद पवार

sharad panwar
शिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर या 40 आमदारांपैकी एकही जण निवडून येणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
 
शिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्र वेगळं असेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
 
"सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगलं काम केल्याचं ठिकठिकाणी ऐकायला मिळतं. प्रदेशाध्यक्षांनी सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे," अशी सूचना शरद पवार यांनी केली.
 
शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यांवरही भाष्य केल्याचं  वृत्तात म्हटलं आहे.