रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (08:00 IST)

यवतमाळच्या डॉ. सुरेखा बरलोटा यांचा मृत्यू

accident
यवतमाळ येथील मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. पीयूष बरलोटा यांच्या वाहनाला तेलंगणामध्ये हैदराबाद ते निर्मल मार्गावर अपघात झाला. या अपघातात डॉ. पीयूष बरलोटा यांच्या पत्नी प्रसूती रोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना , मंगळवारी  घडली.
डॉ. बरलोटा व त्यांचे मित्र कुटुंबासह फिरायला गेले होते. हैदराबाद येथून चारचाकी वाहनाने यवतमाळकडे परत येत असताना हैदराबाद ते निर्मल मार्गावर निर्मलपासून १२ किमी अंतरावरील टोल नाक्यानजीक त्यांच्या चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पूजा पीयूष बरलोटा (१६), अतिथी (१८) आणि मिनल (४०) हे तीण जण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना वाहनाबाहेर काढून निर्मल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
यवतमाळ येथील मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. पीयूष बरलोटा यांच्या वाहनाला तेलंगणामध्ये हैदराबाद ते निर्मल मार्गावर अपघात झाला. या अपघातात डॉ. पीयूष बरलोटा यांच्या पत्नी प्रसूती रोगतज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना  मंगळवारी घडली.
डॉ. बरलोटा व त्यांचे मित्र कुटुंबासह फिरायला गेले होते. हैदराबाद येथून चारचाकी वाहनाने यवतमाळकडे परत येत असताना हैदराबाद ते निर्मल मार्गावर निर्मलपासून १२ किमी अंतरावरील टोल नाक्यानजीक त्यांच्या चारचाकी वाहनाचा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पूजा पीयूष बरलोटा (१६), अतिथी (१८) आणि मिनल (४०) हे तीण जण जखमी झाले. नागरिकांनी जखमींना वाहनाबाहेर काढून निर्मल येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Edited by : Ratnadeep Ranshoor