1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 जून 2025 (18:14 IST)

Weather News:पुणे-मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी

rain
Weather News:राज्यात मान्सूनच्या प्रवेशानंतर मे महिन्यात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पुढील 4 दिवसांत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मुंबई, ठाणे आणि त्याच्या उपनगरात पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला असला तरी, आठवड्याभरानंतर त्याचा वेग मंदावला. आता मान्सून उत्तरेकडे सरकत आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
13 ते 18 जून दरम्यान राज्यातील बहुतेक भागात मुसळधारपावसाची शक्यता 
राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वाशीम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, अहमदनगर, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, 13 ते 18 जून दरम्यान राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Edited By - Priya Dixit