शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (11:29 IST)

तलवारीने वाढदिवसाचा केक कापणे तरुणांना भोवले, गुन्हा दाखल

crime
वाढ दिवसाच्या दिवशी काही तरुणांनी रस्त्यावर गोंगाट करत तलवारीने केक कापून त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करणे चांगलेच महागात पडले. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तलवार आणि त्यांची वाहने ताब्यात घेतले. ही घटना 25 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 12:30 दरम्यान गडचिरोलीच्याआरमोरी शहरालगत रामाळा मार्गावर घडली असून पाच तरुणांनी रस्त्यावर धुडगूस घालत मित्राचा वाढदिवशी तलवारीने केक कण्याचे फोटो मोबाईल मध्ये घेतल्यावर सोशलमिडीयावर टाकले. या चित्रात आरोपीने हातात तलवार घेतलेली असून त्याने केक कापत आहे.  

या घटनांचे फोटो सोशलमिडीयावर व्हायरल झाले असून घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी ठोस पाऊले घेत संबंधित तरुणांवर कायद्यानुसार कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले असून  या तरुणांपैकी एक जण पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. 

Edited by - Priya Dixit