शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (20:46 IST)

बाप्परे, स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू

मालेगावमधील एका तरुणाला स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाणं जीवावर बेतलं आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना रविवारी मालेगावमध्ये घडली आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
या घटनेत जयेश त्याच्या मित्रासोबत स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेला होता. जयेशने स्विमिंग पूलमधील पाण्यात सूर मारला. जयेशने पाण्यात सूर मारल्यानंतर तो स्विमिंग पूलच्या दुसऱ्या बाजूला पोहत पोहोचला. स्विमिंग पूलमध्ये तो काही वेळ पाण्यातच होता. त्यानंतर त्याचा मित्रही त्याच्या मागे आला. मित्राने त्याची अवस्था पाहून त्याला स्विमिंग पूलच्या बाहेर काढले.
 
मित्राने जयेशला बाहेर स्विमिंग पूलमधून काढल्यानंतर त्याचाकडे धावत आले. तेव्हा जयेशच्या हालचाली सुद्धा सुरु होत्या. त्यांच्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच जयेशचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. डॉक्टरांनी जयेशचा मृत्यू हा हार्ट स्ट्रोकमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.