नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपीला अटक
वाहनाचा कट लागण्याच्या वादावरून ट्रक चालकाने हेल्परच्या मदतीने दुसऱ्या ट्रक चालकाची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे सदर घटना रविवारी सकाळी जरीपटका येथील तथागत चौकाजवळ घडली.
ट्रक ने ओव्हरटेक करून कट लावण्याच्या किरकोळ वादातून एका ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रकचालकाची चाकू भोसकून हत्या केली. तर या घटनेत क्लिनर देखील जखमी झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे. आणि त्याच्या साथीदार क्लिनरला देखील ताब्यात घेतले आहे.
मृत अतुल अर्जुन डहारे आणि जखमी क्लिनर उत्कर्ष शालिकराम विरखेडे असे पीडितांची नावे आहे.
रविवारी सकाळी 9:45 वाजेच्या सुमारास ट्रकचे वजन करण्यासाठी मयत ट्रक चालक अतुल अर्जुन डहारे आणि जखमी उत्कर्ष हे वजन काट्यावर आले. ट्रक उत्कर्ष चालवत असून अतुल त्याच्या सोबत बसला होता.
दोघे धर्मकाटा येथून वाडीच्या दिशेने जात असताना आरोपीच्या ट्रक ने उत्कर्षच्या ट्रकला बेदरकारपणाने चालवत असताना ओव्हरटेक केले. या वरून उत्कर्ष आणि अतुल यांना राग आला.
दोन्ही वाहने तथागत चौकात सिग्नलवर थांबली. अतुल ट्रक मधून खाली उतरला आणि आरोपी ट्रक चालकाच्या ट्रक मध्ये चढला आणि त्याने आरोपीच्या ट्रकच्या चाब्या घेतल्या आणि दोघांना ट्रक व्यवस्थित चालवण्याचा सल्ला देत चाब्या परत दिल्या. नंतर अतुल तिथून निघू लागल्यावर आरोपींने त्याला शिवीगाळ करण्यास सुरु केले. हे ऐकून मृत अतुल आरोपीकडे धावत आला आणि त्याने आरोपीशी वाद घालण्यास सुरु केले.
आरोपीने अतुलच्या छातीवर आणि पोटावर चाकूने हल्ला केला. हे पाहून उत्कर्ष त्याला वाचवण्यासाठी धावला आणि हस्तक्षेप करू लागला. आरोपीने त्याच्यावर देखील हल्ला केला. त्याच्या पायावर चाकू लागला
रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे कॅम्पसमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी दोघांनाही ताबडतोब रुग्णालयात नेले. अतुलला मृत घोषित करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. निलेशच्या ट्रकचा नोंदणी क्रमांक आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, ट्रान्सपोर्टरचा नंबर सापडला. काही तासांतच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
Edited By - Priya Dixit