शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनच्या युवासेनेत बंड अनेक भाजपाच्या वाटेवर

शिवसेनच्या युवासेनेत बंड अनेक भाजपाच्या वाटेवर
मुंबई महापालिका निवडणुकी तयारीत असलेल्या शिवसेनच्या युवा सेनेला धक्का बसणार आहे.. आदित्य ठाकरे यांचे युवा सैनिक  नाराज सैनिक भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

युवासेना अध्यक्षांबाबत तसंच त्यांच्या कार्यशैलीबाबत फेसबुकवर नाराजी व्यक्त करणाऱ्या अमर पावले, या युवा ब्रिगेडच्या कार्यकारिणी सदस्याची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर युवासेनेत असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंची युवासेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.

उच्चभ्रूंवर लक्ष देताना सर्वसामान्य शिवसैनिकांकडे दुर्लक्ष तसंच मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्यांना शिवसेनाप्रणीत संघटनांची जबाबदारी दिल्यामुळे युवासेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.त्यामुळे शिवसेनेनेचा युवा मतदार नाराज असून कदाचित याचा फायदा भाजपा उचलणार आहे.