1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. आरोपींना फाशी होईर्पत स्वस्थ बसणार नाही

आरोपींना फाशी होईर्पत स्वस्थ बसणार नाही

अहमदनगर- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे सांगितले. दरम्यान, पीडित कुटुंबाला शस्त्रपरवाना देण्याचे मुख्मंत्रंनी मान्य केले आहे.
 
रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपर्डी (ता. कर्जत) येथे येऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिल्लीहून विशेष विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत पोहोचले. तेथून कारने ते कोपर्डीत आले. दहा ते पंधरा मिनिटे त्यांनी पीडित कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर चार ते पाच मिनिटे गावकर्‍यांशी संवाद साधला. पीडित कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, असे मुख्यमंर्त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत जलसंधारणमंत्री राम शिंदे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष नामदेव राऊत, पोलीसपाटील समीर जगताप हे होते. वीस मिनिटांत ते बारामतीकडे रवाना झाले.
 
मुख्यमंर्त्यांच्या दौर्‍याबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. सकाळपासूनच राज्य गुप्त वार्ता विभागाचे व सीआयडीचे अधिकारी कोपर्डीत तळ ठोकून होते. तसेच कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा सकाळपासूनच होती. मात्र, मुख्यमंर्त्यांच्या दौर्‍याला कोणीही दुजोरा दिला नव्हता. अखेरीस मुख्यमंत्री बारामतीमार्गे कोपर्डीत दाखल झाले. पीडित कुटुंबीयांशी त्यांनी चर्चा केली.
 
दरम्यान, मुख्यमंत्री येणार म्हणून ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली होती. शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे या ठिकाणी होते. त्यांनी अँट्रासिटी कायद्याचा गैरवापर रोखण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंर्त्यांना दिले.
 
आमची मुलगी नराधमाच्या अत्याचाराला बळी पडली आहे. इतर मुली बळी पडून नये म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी उपा.ययोजना करा, अशी मागणी मुलीच्या आईने मुख्यमंर्त्यांकडे केली. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले असून कुटुंबाला शस्त्रपरवाना देण्याची मागणी कुटुंबाने केली आहे. त्यानुसार मुख्यमंर्त्यांनी शस्त्रपरवाना देण्याचे मान्य केले आहे. या घटनेचा निषेध करावा, तितका कमी आहे. हा खटला फास्ट स्ट्रॅक कोर्टात दररोज चालविला जाईल. या आरोपींना फाशी दिल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन मुख्यमंर्त्यांनी या कुटुंबाला दिले.
पुढील लेख
‘आप’च्या दोन आमदारांना अटक