पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका लांबणीवर
गेल्या काही दिवसापासून जोरदार तयारी सुरु झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकालांबणीवर पडणार आहे. अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. आता ही निवडणूक नोव्हेंबरऐवजी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रत्येकवेळी नवीन यादी तयार करून त्यानुसारच मतदान प्रक्रिया राबविली जाते. मात्र, यंदा 2010 मधील निवडणुकीतील यादीनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. एका जनहित याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पदवीधरच्या मूळ यादीवरच आक्षेप घेत त्यामध्ये गोंधळ असल्याचे मान्य केले. यादीत मतदारांचे छायाचित्र नसणे, बदलेला पत्ता अचूक नसणे, तसेच मृत्यू झाल्यांनतरही मतदारांची नावे यादीत असणे यासारख्या मुद्दय़ांवर बोट ठेऊन नवीन यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले. आता या निवडणुका डिसेंबरनंतर घेण्याचे आदेश देत निवडणूक आयोगाने कालबद्ध कार्यक्रमच आखून दिला आहे. १ नोव्हेंबर २0१६ रोजी पदवी घेऊन तीन वर्षे पूर्ण करणार्याय पदवीधरांना नाव नोंदणी करता येणार आहे.

