बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2025 (12:59 IST)

Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल 
मी स्वतःला भाग्यवान समजते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
 
जेव्हा देवाने तुम्हाला माझे वडील म्हणून निवडले
तेव्हा देवाने माझे जीवन आशीर्वादाने भरून दिले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य मिळावे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मला खात्री आहे बाबा
तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात 
असूच शकत नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या 
माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या स्वप्नांचा त्याग करून 
माझी स्वप्न पूर्ण करणार्‍या 
माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
माझी वाईट वागणूक तुम्ही सहन करत
सतत माझ्या पाठीशी उभे राहिलात
माझे आयुष्य सुखी, समाधानी आणि सुंदर बनवल्याबद्दल 
बाबा तुमचे खूप खूप आभार
वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
माझ्या आयुष्यातील फर्स्ट हीरोला
वाढदिवसानिमित्त सलाम
 
आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल 
मी कृतज्ञ आहे बाबा
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
जेव्हा कोणाचाही माझ्यावर विश्वास नव्हता
तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद
बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे
हॅप्पी बर्थडे बाबा
 
माझ्या आयुष्यातील सुपरमॅन
तू मला नेहमीच प्रेम आणि काळजी दाखवली आहेस
बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमचा नुसता खांद्यावरील हात असल्याने
मला कोणत्याही संकटांशी सामना करण्याची प्रेरणा मिळते 
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मी नेहमीच यश गाठेन
कारण तुम्ही मला कधीही हार मानू देणार नाहीस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
 
प्रेमळ, काळजीवाहू आणि प्रोत्साहित करणारे वडील मला लाभले
माझे खरोखर भाग्य आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा
 
मला स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा