बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : सोमवार, 6 जानेवारी 2025 (18:52 IST)

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

Mother's Day 2025
सासू नव्हे तुम्ही तर भासे मला माझी आई
कधी केला नाही दुरावा
घेता माझी काळजी वेळोवेळी
दिसली कधी उदास तर
मायेने घेता जवळ,
तुमची सावली असावी नेहमीच अशी घरभर
सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
सासू म्हणजे खाष्ट
हे तर फक्त ऐकले होते
मला मात्र असे कधीच जाणवले नाही
तुम्ही दिलेली माया मला 
आधीच कधी मिळाली नाही,
आज आहे तुमचा वाढदिवस
या शुभ दिनी
देते तुमची सूनबाई तुम्हाला शुभेच्छा
 
तुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या
लाडाची लेक आहे मी तुमची
आई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
आई तू माझी लाडाची,
तुमच्याशिवाय नाही जीवनाला अर्थ
तूमची कायम सोबत असावी हाच माझा हट्ट,
सासूबाई असल्या तरी आहात माझ्या मैत्रीण
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नानंतर मिळाला एक चांगला पती,
पण सोबतच मला मिळालेली अजून एक व्यक्ती
म्हणजे माझ्या सासूबाई,
माझा आधारवड आणि प्रेमाचा आधार,
अशा सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू नव्हे तर तर माझी आई झालेल्या
प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
जगातील चांगली सासू असण्यासोबतच
तुम्ही आहात माझी एक चांगली मैत्रीण,
अशी माझ्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
आणि गल्लीत भाई,
पण जगात भारी माझी सासूबाई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय सासूबाई
आजचा दिवस आहे खूपच खास
कारण आज आहे तुमचा वाढदिवस
सतत घडवा तुमचा सहवास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई
 
आपण सुख दुःखात एकमेकांना 
साथ देणाऱ्या सहचारिणी आहोत
नात्याने असाल तुम्ही माझ्या सासूबाई
पण त्याहून आपण चांगल्या मैत्रिणी आहोत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सासूबद्दल नेहमीच वाईट बोलण्याची एवढी काय घाई
माझ्या सासूबाईला मी तर प्रेमाने बोलते आई
माझ्या डोक्यावर त्यांचा मायेचा असतो हात
मनमोकळ्या स्वभावामुळे घडत असतो सुसंवाद
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो
आपली दोघींची प्रेमळ जोडी अशीच अखंड राहो
सासू बाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
सतत हसमुख रहा
कायम मला मार्गदर्शन करा
आमच्यावर तुमच्या प्रेमाचा
असाच वर्षाव व्हावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सासुबाई तुमचं मोलाचं योगदान 
आणि प्रेम आमच्यासाठी अमूल्य आहे
तुमचं जीवन नेहमीच आनंदी आणि आरोग्याने परिपूर्ण असो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
माझ्यावर अगदी हक्काने रागावणाऱ्या
पण तितक्याच हककाने माझ्यावर प्रेम करणाऱ्या
माझ्या सासूबाईंना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
आज आमच्या घरात आनंदी आनंद आहे
आज आमच्या सर्वांच्या लाडक्या
सासूबाईंचा वाढदिवस आहे
आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
सासुबाई तुम्ही आमच्या कुटुंबाचा आधार आहात
तुमचं आयुष्य नेहमीच आनंदाने आणि प्रेमाने भरलेलं असो
तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
 
सासुबाई तुमचं आरोग्य नेहमीच उत्तम असो
आणि तुमचं जीवन सुख-समृद्धीने परिपूर्ण असो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
भाग्यवान असते ती सून जिला
तुमच्यासारखी सासू भेटली
माझ्याभल्याचाच विचार करणार्‍या
माझ्या हितचिंतक असणाऱ्या
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
संपूर्ण कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या
कायम सर्वांची काळजी घेणार्‍या
माझ्या सासूबाईंना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
 
लग्नानंतर आईपासून दूर होत असताना
नवीन घरात कौतुक करणारी
मायेने जवळ घेणारी
चुकलं तर रागवणारी
प्रेमाने योग्य मार्ग दाखवणारी
माझ्या प्रिय आणि लाडक्या
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
नाती जपायची म्हणलं की
विचारपूर्वक पाऊल टाकवं लागत
ते मागे घेण्याची सवय मला
सासूबाई आपणच लावली
आणि माझ्या संसाराचं गोकुळ फुलवलं
अशा माझ्या प्रेमळ आणि मार्गदर्शक असणाऱ्या
सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
संपूर्ण आयुष्य तुम्ही घेतली खूप मेहनत
आणि फुलवला संसार
कमी पडतील शब्द
किती जरी मानले आभार
मनापासून मनोकामना
सुख समाधानाचे जावो
तुमचा येणारा प्रत्येक दिन
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
 
सुटला वारा भरारा
आमच्या घरात आजही आहे
सासूबाईंचाच दरारा
आवडत नाही त्यांना कसला पसारा
नाहीतर करतात आमचा पान उतारा
पण मनाने साफ असणाऱ्या
माझ्या सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
काही माणसं सोने नसली तरी
सोन्यापेक्षा कमी नसतात
त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला
मोल प्राप्त होत असते
अशा माझ्यासाठी अनमोल
सासूबाईंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
 
सासूबाई आपण शतायुषी व्हावे
आपल्याला उत्तम आरोग्य लाभावे
हीच तुमच्या वाढदिवसा दिनी ईश्वराकडे मागणी 
लाडक्या सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा