suvichar
✕

Relationship Tips:जोडीदारासोबत वीकेंड खास बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा

Updated: सोमवार, 4 जुलै 2022 (23:07 IST)
 
1 बाहेर फिरायला जा -
वीकेंडला जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकता. वीकेंडला लाँग ड्राईव्ह, वॉटर पार्क किंवा जवळपासच्या कोणत्याही हिल स्टेशनवर जाऊन जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवू शकतात. जर तुम्ही सहलीला शहराबाहेर जाऊ शकत नसाल तर तुमच्या जोडीदारासोबत शहरातच हँग आउट करा. बाहेर दुपारच्या जेवणावर किंवा चित्रपट पाहण्यासाठी, पार्कमध्ये जाऊन एकमेकांसोबत काही रोमँटिक वेळ घालवा.
 
2 एकत्र स्वयंपाक करा-
 जोडीदाराला घरी सुट्टी साजरी करायची असेल, तर तुम्ही त्यांच्यासोबत घरी काहीतरी मजा करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीचा स्वयंपाक घरी करू शकता. तुमच्या स्वयंपाकातही त्यांचा समावेश करा. दोघांमधील प्रेम वाढेल आणि जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल. जोडीदारासाठी काहीतरी गोड बनवू शकता.
 
3 मनमोकळेपणाने बोला -
आठवड्यातील कामामुळे तुमच्या दोघांमध्ये संवाद होऊ शकत नाही. त्यामुळे वीकेंडला जेव्हा जोडीदाराला सुट्टी असते तेव्हा दोघांनी संध्याकाळी बाल्कनीत किंवा टेरेसवर चहा-कॉफी घेऊन आल्हाददायक वातावरणात बसून मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. मात्र, या गोष्टींचे तक्रारीत रूपांतर करू नका, हेही लक्षात ठेवा.
 
4 कपल पार्टी करा- 
तुम्ही दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी घरी डिनर किंवा डान्स पार्टी करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला हवे असल्यास, फक्त तुम्ही दोघेच सहभागी होऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या खास मित्रांनाही आमंत्रित करू शकता. येथे तुम्ही कँडल लाईट डिनर घेऊ शकता आणि रोमँटिक गाण्यावर नृत्य करू शकता.
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

घरच्या घरी २० मिनिटांत तयार! सोपे आणि खमंग फिश टॅकोस रेसिपी

तेलाचा एक थेंबही न वापरता तयार करा ही डिश, हिवाळ्यात नक्कीच ट्राय करून पाहा

तुमच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवणारे ७ महत्त्वाचे छंद जाणून घ्या

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी: 'या' शासकीय पोर्टलवर नोंदणी करून घरबसल्या मिळवा रोजगार

तुम्हाला पैसे वाया घालवायचे नसतील तर मोसंबी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments