1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (20:54 IST)

Relationship Tips : बायको रुसली आहे, हे उपाय अवलंबवा प्रेम वाढेल

Relationship Tips : एक मुलगा आणि मुलगी विवाहाच्या पवित्र बंधनात प्रवेश करतात, तेव्हा त्यांचे जीवन पूर्णपणे बदलते कारण ते पती-पत्नी बनतात. खरे तर पती-पत्नीचे नाते हे एका नाजूक धाग्याने बांधलेले असते आणि आपली एक छोटीशी चूक आपले नाते बिघडवू शकते. 

या नात्यात जेवढे प्रेम आहे, तेवढेच भांडणही या नात्यात होत असतात .अनेकदा भांडण विकोपाला जातात आणि बायको रुसून बसते. बायको रुसली असल्यास तिला अशा प्रकारे मनवू शकता. चला तर मग जाणून घ्या या रुसलेल्या बायकोला कसे मनवू शकतो. 
 
सरप्राईज देऊन- 
बायको तुमच्यावर रुसली असेल तर तुम्ही तिला काहीतरी सरप्राईज देऊन तिला मनवू शकता. तिला तिच्या आवडीच्या ठिकाणी येऊ शकता. किंवा तिला आवडेल तर करून तिचा रुसवा घालवू शकता. 
 
खरेदीला घेऊन जा-
रुसलेल्या बायकोचा रुसवा घालवण्यासाठी तिला शॉपिंगला घेऊन जा. स्त्रियांना शॉपिंग करायला खूप आवडते. शॉपिंग करायला मिळल्यामुळे त्यांचा रुसवा नक्कीच जाईल. 
 
स्वतःची चूक मान्य करून- 
नवरा बायको मध्ये भांडण होणं हे सामान्य आहे. तुमच्या एखाद्या चुकीसाठी बायको रुसली असल्यास तुम्ही लगेच आपली चूक मान्य करून भांडण मिटवून द्या. पुन्हा अशी चूक होणार नाही असं वचन देऊन आपसातील मतभेद किंवा भांडण मिटवू शकता. असं केल्याने बायकोचा रुसवा नक्कीच जाईल.आणि तुमचे नाते बहरून निघेल. 
 
भेटवस्तू द्या- 
बायकोचा रुसवा दूर करण्यासाठी तुम्ही तिला एखादे गिफ्ट देऊ शकता. एखादा ड्रेस किंवा दागिना भेट देऊन किंवा गुलाबाचं फुल देऊन देखील तुम्ही तिच्या रुसलेल्या चेहऱ्यावर हसू आणूं शकता. 
 
Edited by - Priya Dixit