मुलांना मानसिकदृष्टया मजबूत बनवण्यासाठी या गोष्टी शिकवा.
आज आई वडिल नोकरदार असल्यामुळे मुलांना कमी वेळ देतात यामुळे पालक आणि मुलांमध्ये भावनिक आणि मानसिकदृष्टया जवळीक खूप कमी पहायला मिळते यांमुळे मुळे मानसिकरित्या कमजोर होता आहेत. काही मुले घाबरतात. काहींचा आत्मविश्वास कमी होतो. मुलांना मानसिक दृष्टया बळकट बनवायचे असेल तर त्यांना या गोष्टी नक्की शिकवा.
संगीत-
मुलांमधील तणाव आणि भीती घालवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे संगीत आहे. कारण हे मुलांना मानसिकरीत्या मजबूत बनवण्यासाठी मदत करते.
ड्राइंग-
मुले आपल्या मनातील भावना ड्राइंगच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. यामुळे त्यांच्यातील तणाव पण कमी होतो. आशात मुलांच्या आत्मविश्वासाला वाढवण्यासाठी ड्राइंग मदत करते.
डांस-
हे एक प्रकारचे वर्कआउट आहे. डांस केल्याने मुले तणावमुक्त राहतात जर तुमच्या पाल्याला देखील डान्सची आवड आहे तर हे काम त्याला आनंदी करू शकते. तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे कोणताही डांस फोम शिकू द्या व करू द्या .
स्पोर्टस-
खेळणे ही एक अशी गोष्ट आहे ज्यात मुले हरणे व जिंकणे यातला फरक समजून घेतात. खेळतांना जर का ते हरलेत तर त्यांना कसे करून निघायचे हे शिकण्यासाठी स्पोर्टस त्यांची खूप मदत करते.
आपण क्रिकेट, फुटबॉल किंवा त्यांच्या आवडीचा कोणताही खेळ खेळण्यासठी त्यांना प्रोत्साहित करा. तसेच ते खेळात हारल्यावर त्याला कसे मॅनेज करायचे हे पण शिकू द्या.