Russia Ukraine Crisis : युक्रेनने रशियन तळावर मोठा हल्ला केल्याचा दावा केला, 200 सैनिक ठार
युक्रेनच्या लुहान्स्क प्रदेशाचे गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी एका टेलिग्राम पोस्टमध्ये दावा केला आहे की आमच्या सैन्याने रशियाच्या ताब्यात असलेल्या कदिव्का शहरातील हॉटेल तळावर हल्ला केला आहे. त्यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील भागात (जिथे रशियाचा कब्जा आहे) तळ उद्ध्वस्त करून 200 रशियन हवाई पॅराट्रूपर्स मारले आहेत.
युक्रेनियन सैन्य 2014 पासून लुहान्स्क आणि जवळच्या डोन्स्क-प्रशासित जिल्ह्यात रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांशी लढत आहे. रशियाने क्रिमियाला जोडल्यापासून हा संघर्ष सुरू झाला. लुहान्स्कचे गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनीही त्यांच्या पोस्टमध्ये इमारतींची छायाचित्रे दाखवली, ज्यात अनेक पडझड झालेल्या इमारती दाखवल्या होत्या. 19 जुलै रोजी, युक्रेनच्या सैन्याने पूर्व युक्रेनच्या डॉनबास भागात बीएम-21 मल्टिपल रॉकेट लाँचर उडवले, असे ते म्हणाले. तेव्हाही रशियाला खूप त्रास झाला होता.
शुक्रवारी युक्रेनियन सैन्याने रशियन तळावर केलेल्या हल्ल्यात 200 हवाई सैनिक मारले, असे ते म्हणाले. रशियन सैन्याने जुलैमध्ये पूर्व युक्रेनमधील अनेक भाग ताब्यात घेतल्यानंतर, युक्रेनचे सैन्य ते पुन्हा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे.