सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: मंगळवार, 3 जानेवारी 2023 (16:54 IST)

Russia Ukraine War: रॉकेट हल्ल्यात 63 रशियन सैनिक ठार

हिवाळ्यात युद्धाचा वेग मंदावेल या अंदाजाच्या उलट रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा तीव्र होत आहे. 2023 च्या सुरुवातीच्या दोन दिवसांत दोन्ही बाजूंचे 113 जवान शहीद झाले आहेत. युक्रेनियन सैन्याच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन हिमर्स रॉकेटने माकीव्हकावर केलेल्या एकाच हल्ल्यात 63 रशियन सैनिक मारले गेले. त्याचवेळी, रशियन सैन्याने सांगितले की रविवार ते सोमवार दरम्यान लुहान्स्कमध्ये 50 हून अधिक युक्रेन सैनिक मारले गेले.
 
लुहान्स्कमधील रशियन-नियुक्त प्रशासक इगोर स्ट्रेलकोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनच्या हल्ल्यात शेकडो सैनिक मारले गेले आहेत. त्याच वेळी, रशियन सैन्याने सांगितले की, गेल्या एका दिवसात, युक्रेनच्या सैन्याने लुहान्स्क आणि डोनेस्कवर 400 हल्ले केले, त्यामुळे सुमारे 16,000 घरे वीजविना आहेत
 
Edited By - Priya Dixit