गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

'सचिन क्रिकेटचा कोहीनूर हिरा'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा कोहीनूर हिरा आहे. क्रिकेटमध्ये सलग 20 वर्षांपर्यंत खेळत राहणे हा संपूर्ण समर्पण भावनेचा परिणाम आहे, असे मत हिंदुस्थान लिडरशीप संमेलनात सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि न्यूझीलंडचा माजी गोलंदाज रिचर्ड हॅडली यांनी व्यक्त केले.

सचिन मागील 20 वर्षांपासून सतत खेळत असून धावा करीत आहे. खर्‍या अर्थाने क्रिकेटचा तो 'आयकॉन' आहे, असे गावसकर यांनी सांगितले. सचिनने फक्त कसोटी क्रिकेट खेळावे या सल्लाबाबत बोलताना ते म्हणाले,' सचिनची ड्रेसिंगरुममधील उपस्थितीच कनिष्ठ खेळाडूंसाठी प्रेरणा ठरते. यामुळे त्याने फक्त कसोटी सामने खेळावे, हे सांगणे मुर्खपणाचे आहे. '

शास्त्रीने सांगितले की, चेन्नईत 1998 साली 155 धावांची केलेली सचिनने केलेली खेळी ही पर्थनंतरची सर्वोत्कृष्ट दुसरी खेळी आहे. सचिनच्या या शतकाने मालिकेची दिशाच बदलून दिली. हॅडलीने सचिनची सर्वोत्कृष्ट खेळी सांगणे कठीण असल्याचे सांगितले. सचिनने भारत आणि भारताबाहेर चांगली कामगिरी केली असल्याचे हॅडलीने सांगितेल.